🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भराडी मातेला वंदन करून कोरोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना केली. आंगणेवाडीच्या जत्रेत कोरोना काळात गर्दी करू नका या केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लाखो भाविकांना धन्यवादही दिले. माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे असा आशीर्वाद भराडी देवीकडे मागतांना मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लघु पाटबंधारे योजना मसुरे-आंगणेवाडी, कोल्हापूरी पाटबंधारा योजना मालोड-मालडी ता. मालवण तसेच लघु पाटबंधारे योजना कुंभवडे ता. कणकवली जि. सिंधुदूर्ग या योजनांचे ऑनलाईन भुमीपुजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मला गेल्या वर्षीचे भक्तांनी फुलून गेलेले मंदिर आठवते. भराडी मातेची कृपा म्हणून इतके वर्षे मार्गी न लागलेल्या या तीन योजना आज मार्गी लागत आहेत याचा निश्चित आनंद आहे. भराडी मातेला वंदन करून प्रत्येकजण काही ना काही मागतो पण मी भराडी मातेला विनंती करतो की माझ्या शक्तीचा कण न कण कोकणवासियांसाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी वापरता येऊ दे, माझ्या हातून महाराष्ट्राचा विकास होऊ दे. असे मागणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागितले.
महत्वाच्या बातम्या
- नितळ त्वचेसाठी घ्या ‘या’ रसांचा आस्वाद
- विकेटच्या मागून एवढी बडबड का करतोस? पंतने दिलं अभिमानास्पद उत्तर
- मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल ना ?, चित्रा वाघांचा ठाकरे सरकारला सवाल
- मृत्युपूर्वी हिरेन यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र; पत्रातून झाला धक्कादायक खुलासा
- ‘कायदा सर्वोच्च, त्याच्याशी बांधील राहिलं पाहिजे’ तापसीच्या प्रियकराला केंद्रीय क्रीडा मंत्र्याचं प्रतिउत्तर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
