मुंबई : राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच काही दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्षाचा वर्धापनदिन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, वर्धापनदिन सोहळा रद्द केला असला तरी राज्यभरात ९ मार्च रोजी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली जाणार असल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि गर्दीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे यंदा मनसेचा वर्धापनदिन सोहळ्याचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे. त्याऐवजी ९ मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी राज्यभरात सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद लॉकडाऊनबद्दल मनपा आयुक्तांची महत्त्वाची माहिती, म्हणाले..
- मराठवाड्यात ऑक्सिजन टँक वाढवण्याच्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांच्या सूचना
- स्वॅब न देताच रुग्ण येत आहेत कोरोना पॉझिटिव्ह; बुलढाण्यातील अजब प्रकार समोर !
- पंकजा मुंडे मतदारसंघात सक्रिय; पक्षातील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! २४ तासांत ४५९ नव्या रुग्णांची नोंद; पाच जणांचा मृत्यू


