बेळगाव – कर्नाटकमधील भाजपचे नेते, बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची अश्लील सीडी सार्वजनिक झाली आहे. नोकरीचे आमिष दाखवून त्यांनी एका मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
बेंगलुरू येथील नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कल्लाहल्ली यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. कल्लाहल्ली यांनी सांगितले की मी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलीसोबत हा प्रकार घडला असून काल मंगळवारी हा सगळा प्रकार चर्चेत आला आहे. नोकरी देण्याच्या बदल्यात लैंगिक संबंधांची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
दरम्यान, या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बेंगळुरूमध्ये मंत्री रमेश जारकिहोळी यांच्याविरोधात धरणे आंदोलन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
कॉंग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी रमेश जारकीहोली यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणी एफआयआर दाखल करावा.
या प्रकरणातील वाद वाढल्यानंतर मंत्री रमेश जारकिहोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी बुधवारी आपला राजीनामा मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना सादर केला. यानंतर रमेश जारकिहोळी म्हणाले, आरोप हे तथ्यहीन आहेत. माझा असा विश्वास आहे की मी निर्दोष आहे, परंतु मी नैतिक कारणास्तव राजीनामा देत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
- खळबळ! मनसेमुळे जमीन बळकावणाऱ्या बीडमधील ‘प्रतिष्ठितां’वर गुन्हा
- वेतन थकल्याने अब्दुल सत्तारांच्या विरोधात ‘शोले स्टाईल’ आंदोलन
- पंतप्रधानांना स्पीड पोस्टने पाठवल्या गोवऱ्या; गॅस दरवाढीचा निषेध
- औरंगाबाद मनपा भुंखडाचा वाद विधानसभेत; नगरविकास मंत्री शिंदे यांचा तथ्य नसल्याचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
