रायपूर : भारतात सध्या इंडिया रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी 20 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत 5 मार्चला बांगलादेश लिजेंड्स विरुद्ध इंडिया लिजेंड्स India Legends यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात इंडियाने बांगलादेशवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतरच्या अनेक वर्षांनतरही वीरेंद्र सेहवागचा जलवा कायम आहे. सेहवागने आपल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. या सामन्यात सेहवागने विजयी खेळी साकारली. सेहवागने एकूण 35 चेंडूत 80 धावांची नाबाद खेळी केली.
बांगलादेशने प्रथम टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बांगलादेशला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आले नाही. इंडियाच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशचा डाव 109 धावांवर 19.4 ओव्हर्स आटोपला.
सेहवागने 80 धावांच्या खेळीसह स्वत:चा रेकॉर्ड मोडला. सेहवागने गेल्या वर्षी या स्पर्धेत विंडिज विरुद्ध 74 धावांची खेळी केली होती. ही सेहवागची सर्वोच्च धावसंख्या होती. इंडियाचा या विजयासह हा तिसरा विजय ठरला आहे.
इंडिया लेजेंड्सचा संघ
सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, युसुफ पठाण, नमन ओझा, झहीर खान, प्रज्ञान ओझा, नोएल डेव्हिड, मुनाफ पटेल, इरफान पठाण आणि मनप्रीत गोनी.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यासाठी खुशखबर या दोन नवीन रेल्वे गाड्या सुरु होणार
- कोरानाच्या काळात पोलिसांची काळजी घेण्यात सरकार अपयशी
- ‘न्याय मागण्यासाठी गेलो तर पोलिसांनी कुत्र्यासारखे हाकलून लावले’
- विद्यार्थी सुविधा केंद्राची परीक्षा विभागात स्थापना
- डाळी शंभरीत गेल्याने महिलांचे आर्थिक गणित कोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

