औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेत सदस्यांनी घेतलेल्या अक्रमक पवित्र्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी ‘पेट’ परिक्षेचा दुसरा पेपर हा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ३० जानेवारी रोजी झालेल्या ‘जनरल अॅप्टिट्यूड टेस्ट’ च्या झालेल्या परिक्षेत कॉपी झाल्याची तक्रार आल्यामुळे दुसरा पेपर परिक्षा केंद्रावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता तो बदलण्यात आला आहे.
डिसेंबर महिन्यात जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर ‘पेट’ परिक्षेचा पहीला पेपर घरी बसून ऑनलाइन घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र या परिक्षेत कॉपी झाल्याच्या तक्रारी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे आल्या होत्या. यामुळे कुलगुरूंनी दुसरा पेपर हा परीक्षा केंद्रावर घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शुक्रवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अर्थसंकल्पीय आधिसभा सुरु होताच प्रा. सुनील मगरे यांनी ‘पेट’ विषयी निर्णय घ्या असा आग्रह धरला. अभाविपने दिलेल्या निवेदनामुळे कुलगुरूंनी पेट परीक्षा ऑनलाइन न घेता ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे उत्कर्ष पॅनलच्या सदस्यांना वाटत होते. त्यामुळे ‘पेट’ चा दुसरा पेपरही ऑनलाइनच घेतला पाहिजे, असे प्रा. मगरे म्हटले.
कॉपी प्रकरणावर बोलताना जहूर शेख म्हणाले, ‘यूजी-पीजीच्या परीक्षाही ऑनलाइन झाल्या. त्यातही कॉपी झाली असे तुम्हाला म्हणायचे आहे का?’ यावेळी प्रा. संभाजी भोसले, संजय काळबांडे, विजय सुबुकडे आणि प्रा. मगरे यांनी कुलगुरूंच्या समोर जमिनीवर ठाण मांडले. त्यांना संजय निंबाळकर, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. सतीश दांडगे डॉ. गोविंद काळे, रमेश भुतेकर आणि डॉ. नरेंद्र काळे यांनीही पाठिंबा दिला. सदस्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे कुलगुरुंनी आपला निर्णय बदलला.
महत्वाच्या बातम्या
- पालकमंत्री देसाई दोन दिवसात घेणार शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी बैठक
- मराठवाड्यात ऑक्सिजन टँक वाढवण्याच्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांच्या सूचना
- आखेर ‘त्या’ महिलांच्या आभूतपुर्व लढ्याला यश; दारुबंदीचा ठराव मंजूर
- टीसीच्या नोकरीचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणाचा तिघांना १६ लाखांचा गंडा
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! २४ तासांत ४५९ नव्या रुग्णांची नोंद; पाच जणांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

