Share

आखेर ‘त्या’ महिलांच्या आभूतपुर्व लढ्याला यश; दारुबंदीचा ठराव मंजूर

Published On: 

नांदेड : जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील नायगाव येथील गावातील महिलांच्या लढ्याला अभूतपुर्व यश आले आहे. मागील अनेक दिवसापासून सुरु असलेलली गावातील महिलांची दारुबंदीची मागणी आखेर पुर्ण झाली. शुक्रवारी ११ वाजता झालेल्या ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव मंजूर झाला आहे. यामुळे या गावातील महिलांच्या अभूतपुर्व लढ्याला यश मिळाले आहे.

मागील काही महिन्यापासून नायगाव येथील महिलांची दारुबंदीची मागणी होती. दारुबंदीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. नंतर ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर पहीले दारुबंदी मग सरपंच असा पवित्रा घेतल्याने सरपंच व उपसरपंच निवड पोलिस बंदोबस्तात पार पाडावी लागली. मात्र आखेर शुक्रवारी ३७४ महिलांच्या इन कॅमेरा स्वाक्षऱ्या करत दारुबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला आणि महिलांच्या आंदोलनाला यश आले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुरु झालेली ही प्रक्रिया सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालु होती.

ग्रामसभेच्या वेळी कोरोनाचे सर्व नियम या वेळी पाळण्यात आले. ग्रामसभेत ठराव घेतल्यानंतर महिलांचे ओळखपत्र घेऊन स्वाक्षऱ्या घेतल्यानंतर हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली. दारूचे दुकान सुरू ठेवण्याच्या बाजूने एकही मत पडले नाही. ही ग्रामसभा सरपंच नागेंद्र सुर्यकार व सचिव ग्रामसेवक एस. एस. जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. दारूबंदीसाठी महिला आठ तास बसून होत्या. यासंबधीचे वृत्त दैनीक दिव्य मराठीने प्रकाशीत केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!