🕒 1 min read
औरंगाबाद : उन्हाळ्याच्या तोंडावर शहरात तीव्र पाणी टंचाईस सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात आठ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. सिडको-हडकोतील नागरिकांवर तर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे पाणी साठवून ठेवावे लागत असल्याने यात मोठ्या प्रमाणावर जंत निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सिडको हडको येथील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस रवी तांगडे पाटील यांनी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे केली आहे.
सिडको-हडकोतील पाणी प्रश्न हा अतिशय जुना आहे. नागरिकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता पाण्याच्या वेळा आणि दिवस बदलले जात असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. जायकवाडी भरूनही शहरात सहा ते सात दिवसाआड पाणी येते. सिडको-हडकोवासियांना तर पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीसाठी संघर्ष करण्याची वेळ येउन ठेपली आहे. काही दिवसापासून सात दिवसाला किंवा नवव्या दिवशी या पाणीपुरवठा होत असून वारंवार तक्रार करूनही अधिकारी लक्ष देत नाही पाणी असूनही फक्त पाणी टंचाई सिडको-हडकोला का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
वर्षभरापासून सिडको-हडको भागाला चार ते सहा दिवसांआड पाणी येते. परिणामी सात दिवस साठवलेल्या पाण्याचा वास येत असून जंत होत आहेत हे पाणी पिण्यास नागरिकांमध्ये रोगराईचा धोका वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात हे योग्य नाही. त्यामुळे सिडको परिसरात साठवलेल्या पिण्याच्या पाण्याची लवकरात लवकर चाचणी करावी आरोग्याचा व पिण्याचा प्रश्न सोडवावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता भांगे, कार्याध्यक्ष कय्युम शेख, शहर सरचिटणीस रवी तांगडे पाटील आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- औषधाचा साठा करणे अयोग्यच, अजितदादांनी सुजय विखेंना खडसावलं
- २२ मृतदेहांच्या अवहेलना प्रकरणी पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेवर टीका
- मिशन खाम : नदीला जोडलेल्या नाल्यांमधून मनपाने काढला १५४ ट्रक कचरा
- रक्तदान करून थेट लसीकरणाला मिळवा प्रवेश; लातूर महापौरांचे आवाहन
- राष्ट्रवादीच्या चव्हाणांची शिवसेना मतदारसंघातील वैजापूर कोविड सेंटरला भेट, सुविधांच्या अभावावरुन नाराजी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
