Share

२२ मृतदेहांच्या अवहेलना प्रकरणी पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेवर टीका

Published On: 

बीड : जिल्ह्यातील अंबेजोगाईमध्ये एकाच रुग्णवाहिकेत २२ मृतदेह कोंबल्याची घटना समोर आली आहे. यावरुन राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीय. बीड जिल्ह्याकडे आता मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनीच लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या संबंधी टीका करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करावे की संताप हेच कळत नाही. बीड जिल्ह्यावर अत्याचार करायचा हे सरकारने ठरवलेले आहे. प्रशासनाने तर हात टेकले आहे. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. ज्यांच्यावर बीड जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे, ते कर्तव्य पूर्ण करत नाही.’

बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात एकाच दिवशी २२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह नेतांना ते एकाच रुग्णवाहिकेत कोंबण्यात आले होते. या प्रकरणावरुन राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील या प्रकरणावरुन धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!