Share

औषधाचा साठा करणे अयोग्यच, अजितदादांनी सुजय विखेंना खडसावलं

Published On: 

मुंबई : कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वरदान ठरत आहे. पण इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने यावरून राज्यात चांगलाच वाद झाला होता. रेमडेसिवीरच्या साठ्यावरून भाजपवर टीका होत असतानाच अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी मात्र आपल्या जिल्ह्यासाठी गोपनीयरित्या रेमडेसिवीर आणले आहेत. दिल्लीतील एका कंपनीतून त्यांनी अहमदनगरसाठी खासगी विमानाने इंजेक्शन्स आणली. तो सर्व साठा संपल्यानंतर त्यांनी स्वत: फेसबूकवर व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी डॉ. विखे यांनी शिर्डी विमानतळावर दिल्लीहून ही इंजेक्शन्स आणली होती. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डी संस्थान, प्रवरा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयास ती मोफत देण्यात आली. दरम्यान, रेमडेसिवीरचा साठा आला कोठून ? व त्यांना कसा मिळाला ? यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी विखेंना लक्ष्य केलं आहे.

दरम्यान, डॉ. सुजय विखे यांच्यावर योग्य कारवाई केली जावी अशी मागणी करणारी याचिका नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी ही फौजदारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २९ एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. मात्र, तोपर्यंत संबंधित यंत्रणा आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे यासंबंधी कारवाई करू शकतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.

त्यांनतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सुजय विखे यांना टोला लगावला आहे. लोकप्रतिनिधी असले तरीही रेमडेसिवीर या औषधाचा साठा करणे अयोग्य असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. शरद पवार साहेब यांनी देखील अनेक जिल्ह्यांना रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले. मात्र हे करताना त्यांनी जिल्हाधिकारी किंवा शहरांच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे रेमडेसिवीर सुपूर्द केले. प्रशासन जी यंत्रणा राबवते त्यांच्याकडे ही गोष्ट देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सुजय विखे यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सत्ताधारी किंवा विरोधक कोणीही असले तरी सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे. तसेच ते जनतेच्या हिताचे आहे का हे तपासून पुढील निर्णय घ्यावे, असेही अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!