औरंगाबाद : महापालिकेने खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत आता नदीला जोडणाऱ्या नाल्यांची सफाई केली जात असून आत्तापर्यंत १५ किलोमीटर लांबीचे नाले स्वच्छ करण्यात आले आहेत. या नाल्यातून १५४ ट्रक कचरा काढण्यात आला आहे.
महापालिका औरंगाबाद, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, तसेच छावणी परिषद, व्हेरॉक कंपनी, इको सत्व आणि सीआयआयच्या माध्यमातून खाम नदीचे पुनरुज्जीवन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून प्रशासक पांडेय यांनी खाम नदीला जोडले जोडणाऱ्या नाल्यांची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेतले. यासंदर्भात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले की यासाठी नऊ जणांचे टास्क फोर्स तयार करण्यात आले आहेत.
यात प्रत्येक विभागाच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ यांच्या नेतृत्वात ते काम करत आहेत. रेणुका गायकवाड, जितेंद्र भाले, मोहम्मद युसुफ आणि आम्रपाली डोंगरे यांचा समावेश असलेल्या टिम्स रहिवाशांमध्ये जनजागृतीचे काम करत आहेत. तसेच साफ सफाईसाठी दोन जेसीबी, उत्खनन मशीन, दोन टिप्पर आणि एक पोकलेन देण्यात आले आहेत.
तिथे जेसीबी किंवा मोठ्या मशीन वापरता येत नाहीत तिथे कर्मचाऱ्यांमार्फत सफाई केली जात आहे. आत्तापर्यंत १५४ ट्रक कचरा उचलण्यात आला आहे. नागरिकांनी नाल्यात कचरा टाकू नये यासाठी चार पूलांवर बॅरिकेड्स बसविण्यात आले आहेत. रहिवासी आणि व्यावसायिकांनी नाले स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन आस्तिक कुमार पांडेय यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रक्तदान करून थेट लसीकरणाला मिळवा प्रवेश; लातूर महापौरांचे आवाहन
- राष्ट्रवादीच्या चव्हाणांची शिवसेना मतदारसंघातील वैजापूर कोविड सेंटरला भेट, सुविधांच्या अभावावरुन नाराजी!
- मोठी बातमी : उद्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक, राज्यातलं लॉकडाऊन पुन्हा वाढणार ?
- पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव आहेत; भाजपने काँग्रेसला डिवचलं
- राज्याच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे रोज सरासरी २ लाख लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
