🕒 1 min read
लातूर: राज्यात तसेच देशात सर्वत्र लसीकरणाची मोहीम चालू आहे. आता १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली त्या नंतर वृद्ध नागरिकांना तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देणे सुरु आहे. आता पुढच्या महिन्याच्या एक तारखेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. लसीकरणासाठी गर्दी होऊ नये या साठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. जिल्ह्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी रक्तदान करण्याचे देखील आवाहन केले आहे.
येत्या १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. मात्र लस घेतल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासू शकतो. तो भासू नये म्हणून महापौर गोजमगुंडे यांच्या संकल्पनेतून जी व्यक्ती रक्तदान केल्याचे कार्ड दाखवेल, त्यास थेट लसीकरण केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी रक्तदान आवश्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी सर्वांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.
लसीकरणाच्या या टप्प्यात मोठ्या संख्येने नागरीक लसीकरणासाठी येणार आहेत. शासनाच्या निर्देशानुसार आजपर्यंत पालिकेने त्या-त्या वयोगटातील नागरिकांना लसीकरण केले आहे. महापालिकेच्या वतीने सध्या अनेक केंद्रांवर मोफत लसीकरण केले जात आहे. शहरातील खाजगी रुग्णालयातही लसीकरणाची सुविधा आहे. लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता या टप्प्यासाठी आणखी नवी लसीकरण केंद्र सुरू केली जाणार आहेत. लसीकरणाचा ५० हजारांचा टप्पा पालिकेने ओलांडला आहे. कोरोनामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष होऊ शकते. अशा स्थितीत एखाद्या व्यक्तीला गरज पडली तर त्याला रक्त मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे रक्तसाठा वाढवण्याचीही गरज निर्माण झाली आहे. तसेच लस घेतल्यानंतर २ महिने रक्तदान करता येत नाही, ही बाब लक्षात घेता युवा वर्गाला रक्तदानासाठी प्रेरित करण्यास महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची ही संकल्पना फायद्याची ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या चव्हाणांची शिवसेना मतदारसंघातील वैजापूर कोविड सेंटरला भेट, सुविधांच्या अभावावरुन नाराजी!
- मोठी बातमी : उद्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक, राज्यातलं लॉकडाऊन पुन्हा वाढणार ?
- पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव आहेत; भाजपने काँग्रेसला डिवचलं
- राज्याच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे रोज सरासरी २ लाख लसीकरण
- रहिवासी आणि खाजगी डॉक्टरांच्या वादात रुग्णांचा अडकला श्वास!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
