मुंबई: पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमने विराट कोहलीच्या कामगिरीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून फ्लॉप फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून धावा येणे बंद झाले आहे. खराब फॉर्ममुळे विराट कोहली विरोधकांच्या निशाण्यावर आलाय.त्यामुळे आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने त्याच्या खराब फॉर्मबाबत मोठा सल्ला दिला आहे.
विराटला (virat kohli) मोलाचा सल्ला देताना वसीम अक्रम (wasim akram) म्हणाला, “मला वाटते की कोहलीने सुरुवातीला खुल्या वृत्तीने फलंदाजी केली पाहिजे, ज्यामुळे सुरुवातीच्या काही षटकांमध्ये येणार्या चेंडूचा प्रभाव कमी होईल. यासह, इनस्विंग चेंडू त्याच्या पॅडवर आदळणार नाही. त्याने सरळ स्टान्समध्ये खेळायला हवे. मला वाटतं की विराटला जर वाटत असेल की तो डावखुरा गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करत आहे, तर त्याने हे लवकर करायला हवे.”
विराट सध्या IPL 2022 खेळत आहे. तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाज मानला जातो. मात्र सध्या आयपीएलमध्ये तीन डावात त्याला कोणताही चमत्कार दाखवता आला नाही. त्याने पंजाब किंग्जविरुद्ध ४१ धावा आणि कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध केवळ १२ धावाआणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध ५ धावा केल्या. या मोसमात विराट त्याची आयकॉनिक खेळी करेल का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPLच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी..! ‘या’ देशात लाइव्ह प्रसारण बंद; वाचा नक्की झालं काय?
- INS विक्रांतप्रकरणी संरक्षणमंत्र्यांनी चौकशी करावी; राऊतांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीची मागणी
- बॉक्स ऑफिसवर नशीब आजमावणार बॉलीवूडचे ‘हे’ 5 चित्रपट…
- IPL 2022 : “त्याला टीम इंडियाचा कॅप्टन बनायचंय…”, शोएब अख्तरनं कोणाबद्दल दिलंय हे मत? नक्की वाचा!
- संजय राऊतांची किरीट सोमय्यांना पुन्हा शिवीगाळ..! म्हणाले, “हा येडXX आहे, अशा चूXXX इथं स्थान नाही”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

