🕒 1 min read
मुंबई: IPL 2022 ची जोरदार सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये अनेक विदेशी खेळाडूंनी आपल्या प्रतिभेने क्रिकेट रसिकांना प्रभावित केले आहे. यात श्रीलंकेच्या खेळाडूंचाही समावेश आहे. मात्र त्यांची ही कामगिरी त्यांच्या देशवासियांना बघता येत नाहीये. याचे मुख्य कारण म्हणजे श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जात आहे.
श्रीलंका गंभीर आर्थिक संकटातून (Srilanka economical crisis) जात आहे. टीव्ही चॅनेल आणि वृत्तपत्रांनी त्यांच्या कर्मचार्यांना कामावरून काढून टाकल्यामुळे आयपीएलच्या कव्हरेजला मोठा फटका बसला आहे. दोन प्रमुख वृत्तपत्रांनी स्पर्धेबद्दल बातम्या प्रकाशित केल्या नाहीत, कारण ते अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय संकटावर कव्हरेज करत आहेत. दरम्यान, स्पर्धेचे प्रसारण करणाऱ्या वाहिन्यांना लोकांना कामावरून कमी करावे लागले आणि त्यामुळे त्यांनी प्रसारण बंद केले आहे.
श्रीलंकेच्या आर्थिक संकटाबद्दल आयपीएलचा भाग असलेले श्रीलंकन खेळाडू आणि कोच यांनी या अडचणींबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. ज्यात कुमार संगकारा , महीला जयवर्धने अशा खेळाडूंचा समावेश आहे. तर प्रसारण बंद केल्या संबधी श्रीलंकेच्या एका लोकल मीडिया रिपोर्टने सांगितले की, “ देशातील अनेक क्रिकेट चाहत्यांना आयपीएलचे प्रसारण व्हावे असे वाटते. स्थानिक वाहिन्यांनाही आयपीएलचे सामने दाखवायचे आहेत. मात्र आर्थिक संकटाचा फटका इतका मोठा आहे की, आयपीएलचे प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे. देशाच्या सरकारने काही आठवड्यांपूर्वी पेपरचा पुरवठा संपल्यामुळे शालेय परीक्षा देखील थांबवल्या आहेत.”
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- बॉक्स ऑफिसवर नशीब आजमावणार बॉलीवूडचे ‘हे’ 5 चित्रपट…
- IPL 2022 : “त्याला टीम इंडियाचा कॅप्टन बनायचंय…”, शोएब अख्तरनं कोणाबद्दल दिलंय हे मत? नक्की वाचा!
- “हा येड ** आहे, अशा *** स्थान नाही” – राऊतांची पुन्हा सोमय्यांवर शिवीगाळ
- शरद पवार मोदींच्या भेटीने राजकीय चर्चांना उधान; अजित पवारांनी सांगितले संभाव्य कारण
- मनसेचा पोलिसांना अल्टिमेटम – चार दिवसात भोंगे हटवा अन्यथा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
