Share

‘आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा’; राष्ट्रवादीची बॅनरबाजी

Published On: 

🕒 1 min read

ठाणे : केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याला नव्याने ४ मंत्रीपदे देण्यात आली असून त्यातील एक कॅबिनेट तर उर्वरित तीन हे केंद्रीय राज्यमंत्रिपदे आहेत. ही मंत्रीपदे देण्यात आल्यानंतर आता राज्यात वेगवेगळ्या भागात भाजपने जन आशिर्वाद यात्रा सुरु केली आहे. मात्र भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात जन आशीर्वाद यात्रेविरोधात बॅनरबाजी करून टीकास्त्र सोडलं आहे. ‘आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा,’ असे बॅनर ठाणे शहर काँग्रेसने विविध पेट्रोल पंपाबाहेर लावले आहेत. एकीकडे सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर अधिक आर्थिक बोजा वाढत आहे. कोरोनाचे धोका कायम आहे. अशातच भाजपने जन आशीर्वाद यात्रा काढल्याने विरोधक चांगलेच आरोप करत आहेत.

या बॅनरवर भाजपची जनआशीर्वाद यात्रा, पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले, आधी केलेलं पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा, असा मजकूर छापून इंधनाचे दरपत्रकही छापण्यात आले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच घरगुती गॅसच्या दरात आणखी २५ रुपयांची वाढ झाल्याने गृहिणींनी देखील संताप व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!