Share

‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ हे भाजपने सिद्ध करावे; ACB धाड प्रकरणी काँग्रेसचं आव्हान

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी-चिंचवड : भाजपची एकहाती सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. 9 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कामाचे टेंडर मंजूर झाले होते. त्याची वर्क ऑर्डर काढण्यासाठी एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने नऊ लाखांची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून कारवाई करत स्थायी समिती अध्यक्ष, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि दोन लिपिकांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 18) पिंपरी चिंचवड महापालिकेत करण्यात आली.

यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘भाजपच्या अखत्यारीत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे संगनमताने भ्रष्टाचार करत आहेत. त्याचाच हा परिपाक आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. मात्र आता हे धोरण पाळत असल्याचे भाजप प्रदेश आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सिद्ध करावे,’ असं आव्हान पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांनी दिलं आहे. यासोबतच, भाजपच्या सत्तेतील साडेचार वर्षातील आर्थिक देवाणघेवाणीची नि:पक्षपातीपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!