Share

‘मोदी सरकारच्या दबावातून काही जण महावसुली म्हणत बोंबलत आहेत, पण..’

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी चिंचवड: भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. ९ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आता यावरूनच काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री सचिन सावंत यांनी भाजपवर निशाना साधला आहे.

मोदी सरकारच्या दबावाने काही जणांना आरोप करायला लावून महावसूली महावसूली अशी बोंब ठोकत मविआ सरकारची बदनामी करणारा भाजपाच वसूलीबाज सिध्द झाला आहे. अशी टीका करत त्यांनी भाजपाच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष नितीन लांडगे याला सहा जणांसहीत लाचखोरीच्या आरोपांखाली अटक झाली आहे.असे म्हटले आहे.

दरम्यान आता स्थायी समितीच्या अध्यक्षांनी तातडीने राजीनामा तर दिलाच पाहिजे ,शिवाय भाजप चे चंद्रकांतदादा पाटील यांनी तातडीने यावर स्पष्टीकरण द्यायला हवे. पिंपरी चिंचवड मधील सत्ताधारी भाजप हे आधीच्या सत्ताधाऱ्यांपेक्षा वेगळे कसे हे पण सांगावे अशी मागणी आप आदमी पक्षाचे नेते मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!