मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने आतापर्यंत पाचव्यांदा समन्स बजावले आहेत. ५ वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यामुळे ईडी आता अनिल देशमुखांविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
अनिल देशमुख हे चौकशीसाठी का हजर झाले नाहीत कधी होणार? अशा अनेक चर्चा सुरु असताना स्वत: अनिल देशमुखांनी भाष्य केले आहे.‘मी कायद्याचं पालन करतो. मी जेव्हा हवं तेव्हा ईडीला सामोरे जाईन. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी पुढे जाईल. माझी याचिका कोर्टाने दाखल करुन घेतली आहे’, असं म्हणत अनिल देशमुखांनी आपली भूमिका मांडली आहे.
माझी ईडी बाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा सुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः ईडीच्या समोर जाणार आहे आणि त्यांना सहकार्य करणार आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
अनिल देशमुख यांना ईडीने पहिले समन्स २५ जून रोजी देऊन २६ जून रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आले होते. दुसरे समन्स तात्काळ २६ जून रोजी देऊन आठवड्याभरात म्हणजे ३ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- वैजापूरात मुख्यमंत्री-प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते निकृष्ट; आ. बोरनारेंची ठाकरे सरकारकडे निधीची मागणी!
- ‘मोदी सरकारच्या दबावातून काही जण महावसुली म्हणत बोंबलत आहेत, पण..’
- तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत-राजेश टोपे
- ‘वैद्यकीय शिक्षण विभागातील पदभरतीची प्रक्रिया लवकरच’, मंत्री अमित देशमुखांची माहिती
- ‘मला मोदींनी ओबीसींचे नेतृत्त्व करण्याची संधी दिली’; डॉ. कराडांचा रोख नेमका कोणाकडे?


