मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरवात केली आहे. मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केल्यानंतर या यात्रेला सुरुवात झाली. यानंतर नारायण राणे आणि इतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. भाजपच्या टीकेला आता शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘मुख्यमंत्र्यांना संकट मोचन हे नावं दिलं गेलं आहे. अनेक संकटं येत आहेत, तरीही ते उत्कृष्ट काम करत आहेत. देशातील अनेक नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून स्तुती करत आहेत.’ असं सत्तार यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या शिवसंपर्क अभियानामुळेच भाजपच्या नेत्यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली, असा आरोप सत्तार यांनी केला आहे.
नारायण राणे यांची टीका-
‘उद्धव ठाकरे आडमार्गाने येऊन सत्तेत बसलेत, आम्ही जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. जन आशीर्वाद यात्रेचा प्रतिसाद पाहता फारच कमी दिवस राहिले आहेत, वाट पाहा. पाऊस नसता तर शक्तीप्रदर्शन केलं असतं, पाऊस असून इतके लोक आहेत. आमची शक्ती आमच्या विरोधकांना माहिती आहे,’ असा टोला देखील नारायण राणे यांनी विरोधकांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मला हवं तेव्हा ईडीला सामोरं जाईन’; अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण
- मोदींच्या कार्यकाळात एकही भ्रष्ट्राचाराची केस समोर आली नाही, अर्थ राज्यमंत्र्यांचा दावा
- औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे आयटीआयला प्राधान्य!
- वैजापूरात मुख्यमंत्री-प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते निकृष्ट; आ. बोरनारेंची ठाकरे सरकारकडे निधीची मागणी!
- ‘मोदी सरकारच्या दबावातून काही जण महावसुली म्हणत बोंबलत आहेत, पण..’


