परभणी : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून एकही भ्रष्ट्राचाराची केस समोर आली नसल्याचा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. नव्याने केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झालेले डॉ. कराड सध्या ‘जनआर्शिवाद’ यात्रेनिमित्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांची माहिती देत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नागरिकांनी भरभरून प्रेम केले. त्यांनी देखील लोकांच्या विश्वासाला तडा जावू दिला नाही. मोंदीच्या कार्यकाळात एकही भ्रष्ट्राचाराची केस समोर आली नाही. थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. त्यामुळे देखील भ्रष्ट्राचार कमी झाला असल्याचा दावा डॉ. कराड यांनी केला. मी देखील ‘जनआर्शिवाद’ यात्रेतून लोकांचा आर्शिवाद घेण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले.
#जन_आर्शिवाद_यात्रे दरम्यान वैश्य नागरी सहकारी बँक परभणी व आर्य वैश्य समाज परभणी च्या वतीने आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित केले. याप्रसंगी मागील ७ वर्षात मोदीजीं च्या कार्यकाळात एकही भ्रष्टाचाराची केस समोर आली नाही. pic.twitter.com/GyBIDkYRAG
— Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार) (@DrBhagwatKarad) August 19, 2021
डॉ. भागवत कराड यांची ‘जनआर्शिवाद’ यात्रा बीड, नांदेड, हिंगोली, परभणी मार्गे जालना जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहे. यापुढे जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात ही यात्रा होणार आहे. या माध्यमातून मोदी सरकारच्या चांगल्या कामाची माहिती लोकांना देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. डॉ. कराड यांच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्रात मंत्रीपद प्राप्त झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानचा लाळघोटेपणा!, म्हणे, ‘जगाने तालिबानचे स्वागत करावे’
- औरंगाबादेत ‘धर्मरक्षक’ची यंदा मदतीची दहीहंडी; १०० क्विंटल धान्य पूरग्रस्तांना रवाना!
- ‘हा’ जोकर राहुल गांधींचा इतका खास का आहे याचा आता खुलासा झाला’, भाजपाचा टोला
- ‘वैद्यकीय शिक्षण विभागातील पदभरतीची प्रक्रिया लवकरच’, मंत्री अमित देशमुखांची माहिती
- ‘मला मोदींनी ओबीसींचे नेतृत्त्व करण्याची संधी दिली’; डॉ. कराडांचा रोख नेमका कोणाकडे?


