Share

पुन्हा धुवाधार! राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Published On: 

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील ३ दिवस मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोरदार पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

दरम्यान मराठवाड्यातही जोरदार पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केले आहे. पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सातारा नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड,परभणी, बीड, हिंगोली, जालना, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने दिला आहे. दरम्यान या सर्व जिल्ह्यांना जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. १७ ऑगस्टला राज्यात विविध भागात जोरदार धारा बरसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

तर १८ ऑगस्टला कोल्हापूर सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!