पुणे : संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविषयी बोलणं चांगलंच महागात पडलं आहे. राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 99 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पुण्यात हजेरी लावली होती. तेव्हा राज ठाकरेंनी जाती व्यवस्थेवरुन अप्रत्यक्षपणे काही नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टद्वारे राज ठाकरेंवर सडकून टीका केली.
प्रवीण गायकवाड यांनी केलेल्या टिकेनंतर पुणे मनसे चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळात आहे. मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी गायकवाड यांची कान उघडणी केली आहे. ‘आपण जर आपली पात्रता सोडून बोलला तर आम्हाला महाराष्ट्र सैनिक, राजदूतांना पात्रता सोडून जशास तसं छान उत्तर देता येतं’, असा इशाराही रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रवीण गायकवाड यांना दिला आहे.
‘राज ठाकरे हे नेहमी जातीपातीच्या पलीकडच्या राजकारणातील घटना सांगतात रोखठोक बोलतात. योग्य ते योग्य चूक ते चूक स्पष्ट भूमिका घेतात. एकविसाव्या शतकात महाराष्ट्र व्हिजन, भविष्य संदर्भात बोलतात, तरीही काही संतुष्ट लोकांना, बिनकामी लोकांना बोलायचं असेल तर त्यांनी चौकटीत राहून बोलायचं’, अशा शब्दात रुपाली पाटील यांनी खडेबोल सुनावले आहेत.
https://www.facebook.com/rupalipatilthombare/posts/6185041641536148
दरम्यान, ‘आमचे राज साहेब नुसतं बोलत नाहीत तर सत्य, वस्तुस्थिती आणि रोखठोक बोलतात. काम प्रचंड करतात ते दिसले आहेच की…, उगीच नाही लोक ‘कृष्णकुंज’वर अडचणी घेऊन येत’, असं म्हणत रुपाली पाटील यांनी प्रवीण गायकवाड यांच्या टिकेल सडेतोड उत्तर दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करु’; मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा
- ‘आम्हाला भारतासोबत चांगले आणि मजबूत संबंध हवेत’- तालिबान प्रवक्ते
- ‘नितेश राणेंनी मोदींवर सुद्धा वैयक्तिक टीका केली होती; त्यांना मी उत्तर देणार नाही, पण…’
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- पंतप्रधानांनी दिलेला शब्द पाळला…पीव्ही सिंधूसोबत आईस्क्रीम खाण्याचं वचन अखेर पूर्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

