Share

‘लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करु’; मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा

Published On: 

पुणे : संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड आणि मनसेमध्ये शाब्दिक कलह सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 99 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पुण्यात हजेरी लावली होती. तेव्हा राज ठाकरेंनी जाती व्यवस्थेवरुन अप्रत्यक्षपणे काही नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर प्रविण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले होते.

प्रविण गायकवाड यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर पुण्यातील मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे दिसत आहे. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी, ‘2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून इच्छुक असणारा तू, मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना तुला पाहिलंय. मी प्रविण गायकवाड, असे सांगत होतास. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

https://www.facebook.com/vasantmore88/posts/923346761582922

तर, ‘राज ठाकरे नेहमी जातीपातीच्या पलीकडच्या राजकारणातील घटना सांगतात, रोखठोक बोलतात. योग्य ते योग्य, चूक ते चूक स्पष्ट भूमिका मांडतात. 21 व्या शतकात महाराष्ट्राचे व्हिजन, भविष्य संदर्भात बोलतात. एकच जात माणुसकी, महाराष्ट्र धर्म, तरीही काही असंतुष्ट लोकांना, बिनकामी लोकांना बोलायचे असेल तर त्यांनी चौकटीत बोलायचं,’ असं म्हणत मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील प्रविण गायकवाड यांना चांगलेच सुनावले आहे.

https://www.facebook.com/rupalipatilthombare/posts/6185041641536148

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!