Share

‘नितेश राणेंनी मोदींवर सुद्धा वैयक्तिक टीका केली होती; त्यांना मी उत्तर देणार नाही, पण…’

Published On: 

सिंधुदुर्ग : शिवसेना आणि राणेंच्या घराण्याचा वाद हा वारंवार समोर आला आहे. शिवसेनेनं भाजपची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यापासून राणे कुटुंबीय हे अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप नेते निलेश राणे, आमदार नितेश राणे हे शिवसेनेवर हल्लाबोल करत असतात.

आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलताना नितेश राणेंच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. ‘नितेश राणेंच्या टीकेला मी उत्तर देणार नाही. आमचे पदाधिकारी आणि शाखाप्रमुख त्यांच्या टीकेला उत्तर देतील. नितेश राणेंनी आजपर्यंत कोणावर टीका केली नाही? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा नितेश यांनी वैयक्तिक टीका केली होती, असं उदय सामंत यांनी म्हटलं.

यासोबतच, ‘नितेश राणे नेहमी आपल्या पेक्षा राजकीय उंची जास्त असलेल्या व्यक्तीवर टीका करतात. त्यामुळे त्यांनी माझ्यावर टीका करून त्या पंक्तीत मला बसवले आहे. त्याकडे मी सकारात्मकतेने बघतो,’ असा खोचक टोला देखील सामंत यांनी लगावला. तर, ‘राणेंनी टीका केल्यावर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील आमची मते वाढतात हे आम्हाला पक्क माहीत आहे,’ असं मिश्किल विधान देखील त्यांनी करत राणे कुटुंबियांना लक्ष्य केलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!