मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू घरी परतले होते. मात्र यादरम्यान अनेक विदेशी खेळाडू घरी पोहचु शकले नाही. यात ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला. मात्र अखेर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्वगृही परतले आहेत.
यंदाची आयपीएल स्पर्धा सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरसाठी चांगली नाही राहिली. मात्र आता कुटुंबासोबत तो चांगला वेळ घालवत असताना एका नव्या कारणामुळे त्याची झोप उडाली आहे. ही माहिती खुद्द डेव्हिड वॉर्नरने ट्विट करुन दिली आहे. लॉर्ड्स येथे सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड मालिकेचा सामना बघताना वॉर्नरने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचा फोटो ट्विट करत त्याने झोप उडवली असल्याचे सांगितले आहे.
Trying to get some sleep here in Aus but this bloke pops up on my tv screen!! Few months to get some sleep before the Ashes down under ???????? #ashes #cricket pic.twitter.com/hEOTCzbiD4
— David Warner (@davidwarner31) June 2, 2021
या ट्विटमध्ये वॉर्नरने लिहीले आहे की,’इथे ऑस्ट्रेलियामध्ये मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो मात्र इतक्यात टिव्हीवर हा खेळाडू दिसला. अॅशेजमालीकेपुर्वी काही महिनेच झोपण्याचे काही महिनेच राहिले आहेत.’ असे ट्विट केले. वॉर्नरचे हे ट्विट आगामी अॅशेज मालिकेच्या संदर्भात होते. २०१९ साली पार पडलेल्या अॅशेज मालिकेत स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरला चांगलेच सतावले होते. २०१९ अॅशेज मालिकेत डेव्हिड वॉर्नरने १० डावात अवघ्या ९५ धावा काढल्या होत्या. या मालिकेतील १० डावात ब्रॉडने वॉर्नरला तब्बल ७ वेळा बाद केले होते. ती आठवण म्हणून वॉर्नरने हा फोटो शेअर केला.
महत्त्वाच्या बातम्या
- वर्णद्वेषाला विरोध दर्शविण्यासाठी इंग्लंडच्या संघाने केली ‘ही’ कृती
- बजाजनगरात अर्धनग्न अवस्थेत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला
- अष्टपैलु बेन स्टेक्सच्या अनुपस्थितीत ब्रॉडला मिळाली ‘ही’ जबाबदारी
- सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा राजकारणात प्रवेश ; उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत
- ‘पवारांच्या विरोधात गरळ ओकण्यासाठीच भाजपने पडळकरांना आमदारकी दिली’


