मुंबई : २ जुनपासुन इंग्लंड येथील लॉर्ड्स या मैदानावर इंग्लंड आणि न्युझीलंड या दोन्ही संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्युझीलंडचे वर्चस्व राहिले. पहिल्या दिवसाआखेर न्युझीलंडच्या संघाने ८६ षटकात ३ गडी गमावत २४६ धावांची मजल मारली.
या सामन्यात इंग्लंडच्या संघाने एकाही फिरकीपटुना न खेळवण्याचा धाडसी निर्णय घेतला. तसेच या सामन्यात इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला आणखी एक मोठी जबाबदारी दिली. या अष्टपैलु बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत स्टुअर्ट ब्रॉडला या संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले. कसोटी कारकिर्दीत ब्रॉडला पहिल्यांदाच इतकी मोठी जबाबदारी मिळाली आहे. याआधी ब्रॉडने मर्यादीत षटकांच्या सामन्यात काही काळ ब्रॉडने नेतृत्व केले होते. ब्रॉडने याआधी ३ एकदिवसीय आणि २७ टी-२० सामन्यात इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व केलेले आहे.
Our vice-captain for #ENGvNZ ????@StuartBroad8 ???? pic.twitter.com/emItKObWQX
— England Cricket (@englandcricket) June 1, 2021
२००६ साली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणारा स्टुअर्ट ब्रॉड हा इंग्लंडच्या प्रमुख गोलंदाजापैकी एक आहे. ब्रॉडने १४६ कसोटी सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. या सामन्यात ब्रॉडने तब्बल ५१७ गडी बाद केले आहे. यात त्याने १८ वेळा एका डावात ५ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. तर २ वेळा एका सामन्यात १० बळी घेण्याचीही कामगीरी केली आहे. तर ब्रॉडने १२१ एकदिवसीय सामन्यात १७८ गडी आणि ५६ टी-२० सामन्यात ६५ गडी बाद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ते ट्विट मी केलं नव्हतं तर…’ सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर महापौरांची सारवासारव
- कौतुकास्पद : जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून डिसले गुरुजी यांची नियुक्ती
- संजय राऊतांच ‘ते’ आमंत्रण आम्ही स्वीकारतो; आशिष शेलारांच्या विधानाने उत्सुकता वाढली
- ऱ्हदयद्रावक! मायलेकीसह पुतणीचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
- ‘उद्धवजी… नाकाने कांदे सोलू नका… मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या’


