मुंबई : महाराष्ट्राची कन्या लोकप्रिय गायिका वैशाली माडे नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. वैशाली माडे हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी देखील वैशालीचे पक्षात स्वागत केले आहे. यावेळी पक्षातील काही ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. वैशालीच्या प्रवेशाचा कार्यक्रम पक्षाच्या मुंबई येथील मुख्यालयात झाला.
३१ मे रोजीच वैशालीचा पक्षात प्रवेश होणार होता खासदार सुप्रिया सुळेंसह इतर जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता पण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आजारपणामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. आणि आज ३ जून रोजी वैशालीचा पक्षप्रवेश झाला.
हिंदी तसेच मराठी अशा दोन्ही भाषांतील सिनेमांमध्ये तिनं पार्श्वगायन केल आहे. सुपरहिट हिंदी चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात तिचे ‘पिंगा’ हे तिनं गायलेलं गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यासाठी तिला बरेच पुरस्कार देखील मिळाले. तसेच वैशाली रियालिटी शो ‘मराठी बिग बॉस’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. वैशालीनं तिच्या आवाजच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तिला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय.
महत्वाच्या बातम्या
- ‘ओ परबांनू मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका.. उगाच उद्या ‘इज्जत’ जावुक नको..!’
- ‘सरकारने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने करोना आणि चक्रीवादळांसारख्या आपत्ती आल्या’
- ‘लसीकरणाबाबत केंद्राची पॉलिसी स्पष्ट नाही; रोज नवीन नियमांची होतेय घोषणा’
- ‘ते ट्विट मी केलं नव्हतं तर…’ सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर महापौरांची सारवासारव
- ‘उद्धवजी… नाकाने कांदे सोलू नका… मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

