Share

वर्णद्वेषाला विरोध दर्शविण्यासाठी इंग्लंडच्या संघाने केली ‘ही’ कृती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २ जुनपासुन इंग्लंड येथील लॉर्ड्स या मैदानावर इंग्लंड आणि न्युझीलंड या दोन्ही संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्युझीलंडचे वर्चस्व राहिले. पहिल्या दिवसाआखेर न्युझीलंडच्या संघाने ८६ षटकात ३ गडी गमावत २४६ धावांची मजल मारली.

हा सामना सुरु होण्याआधी न्युझीलंड आणि इंग्लंड संघ जेव्हा राष्ट्रगीतासाठी मैदानावर आले तेव्हा एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. राष्ट्रगीताच्या वेळी इंग्लंडचा संघ चक्क काळ्या रंगाची जर्सी परिधान करुन मैदनात आला होता. अनेकांना या कृतीचा अर्थ उमजला नाही. त्यांच्या या कृतीवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. ही कृती करण्यामागे खरे कारण नंतर समोर आले. वर्णद्वेषाला विरोध करण्यासाठी इंग्लंडच्या संघाने ही जर्सी परिधान केली होती.

क्रिकेट जगतात कोणत्याही भेदभावाला स्थान नाही, हा खेळ सर्वासाठी समान आहे. असा संदेश देत वर्णद्वेषाच्या विरोधात ही जर्सी परिधान केली होती. यावेळी परिधान केलेल्या जर्सीवर ‘क्रिकेट हा खेळ सर्वासाठी आहे’ असा संदेशही लिहलेला होता. वर्णद्वेषाच्या विरोधात इंग्लंडने केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. राष्ट्रगीतानंतर मात्र इंग्लंडच्या संघाने पारंपारीक जर्सी घातली आणि सामना खेलायला मैदानात उतरले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!