Share

‘वारीला एकदम मोकळीक नाही पण आणखी शिथिलता देवू’ -अजित पवार

Published On: 

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यभर थैमान घातले होते. त्यामुळे राज्यभर कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतु सध्या देशभरातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु अजूनही धोका पूर्णपणे टळला नसल्यामुळे काही अंशी सरकारला निर्बंध लावावे लागत आहेत.सध्या राज्यभरातील धार्मिक कार्यक्रमांना मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. याचाच परिणाम आता महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळ्यावर देखील झाला आहे.

महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर पायी वारीला परवानगी देण्यात आली नाहीये. यामुले राज्य सरकावर विरोधक टीका करताना दिसत आहेत. दरम्यान आज पुण्यात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.

यावेळी वारीबद्दल अजित पवार भाष्य करताना म्हणाले कि, ‘आषाढी वारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे.आणि त्याचे आदेश देखील काढण्यात आला आहे. वारी आणि वारकरी समाजाबाबत आम्हाला आदर व प्रेमच आहे. परंतु, सध्याची कोरोना परिस्थिती देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. मागील वर्षीच्या वारी इतकं कडक पण नाही आणि एकदम मोकळीकसुद्धा न देता त्यात मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.’ अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.

तसेच, ‘पायी वारीबाबत निर्णय घेण्याआधी देहू,आळंदीसह इतर मानाच्या प्रमुख पालख्यांच्या प्रमुखांशी आम्ही चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना वारी सोहळ्यासाठी आवश्यक ती सगळी तयारी करण्यास सांगितले आहे. यावेळी लोकप्रतिनिधी,प्रशासन यंत्रणा किंवा वारी मार्गावरील ग्रामस्थांनी कोरोना परिस्थितीमुळे पायी वारी सोहळ्याऐवजी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत बसने वारी सोहळा आयोजित करण्याची मागणी केली आहे. तसेच पंढरपूर येथील प्रशासन यंत्रणांनी देखील कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस झालेल्यांनाच पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येईल असा निर्णय घेतला आहे.’ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!