मुंबई : शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली वादावादी ताजी असतानाच कोकणात पुन्हा त्याची पुनरावृत्ती टळली आहे. सिंधुदुर्गात पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने हा वाद टळला. आमदार वैभव नाईक यांनी भाजपला डिचवण्यासाठी शिवसेना वर्धापण दिनी विशेष योजना जाहीर केली होती. यात भाजप सदस्य असल्याचे कार्ड दाखवणाऱ्याला १ लीटर पेट्रोल मोफत देण्याची त्याची योजना होती. मात्र, त्याच वेळी भाजप कार्यकर्ते तेथे पोहोचल्याने तणाव निर्माण झाला होता.
आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त १०० रुपयात २ लिटर पेट्रोलची योजना आखली होती. त्यात भाजप सदस्य असल्याचे कार्ड दाखवले तर एक लिटर पेट्रोल मोफत देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. विशेष म्हणजे ही योजना राबवण्यासाठी त्यांनी भाजप नेते नारायण राणे यांचा पेट्रोल पंप निवडला. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद झाला.
दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्या नंतर कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. यात आमदार वैभव नाईक यांचाही समावेश होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली, त्यामुळे वाद मिटला. नंतर वैभव नाईक कार्यकर्त्यांसह दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघून गेले.
शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सिंधुदुर्गात झालेल्या राड्यानंतर नारायण राणे यांचे सुपूत्र आणि भाजप आमदार नितेश राणे हे प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करुन शिवसेना खासदार संजय राऊत यांना इशारा दिला आहे.
शिव प्रसाद काय असतो ..
ते संजय राऊतांनी..आमदार वैभव नाईकना विचारावा..
पोटभर दिला आज आमच्या कार्यकर्त्यांनी..
पाहिजे असेल तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिस मधे ..
टेस्ट आवडेल नक्की!! @rautsanjay61— Nitesh Rane (@NiteshNRane) June 19, 2021
‘शिवप्रसाद काय असतो, ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईक यांना विचारावे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोटभर ‘प्रसाद’ दिला आहे. पाहिजे असेल तर तुमच्यासाठी मी सामना ऑफिसमध्ये पार्सल घेऊन येतो. टेस्ट आवडेल नक्की,’ असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता संजय राऊत यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- स्विस बँकांमध्ये भारतीयांची २० हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम?; केंद्र सरकारने दिले ‘हे’ स्पष्टीकरण
- ‘कर्ज काढताना शेतकऱ्यांना फसवले, आता कर्ज भरताना तरी शेतकऱ्यांना पुन्हा फसवू नका’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- ‘बेपत्ता आमदार प्रताप सरनाईक मातोश्रीवरच’ ; भाजपचा खळबळजनक दावा
- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येताच शिवसेना-भाजप संघर्षाचा भडका उडणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

