Share

वर्ध्यातील अवैध गर्भपात प्रकरणी अखेर डॉ. कदम यांना अटक

Published On: 

वर्धा: आर्वी येथील गर्भपात प्रकरणानंतर आता दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या धाड सत्रात रोज नवनवीन पुरावे पोलिसांच्या हाती लागत आहेत. त्यात आता कदम हॉस्पिटलचे डॉ. कदम यांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. १५ जानेवारी रोजी रात्री उशिरा डॉ. कदम (Dr. Kadam) यांना तब्यात घेण्यात आले आहे.

या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला होता. हा प्रकार उघडीस आल्यानंतर मुलीच्या आई व वडिलांसह गर्भपात करणाऱ्या डॉ. रेखा कदम (Dr. Rekha Kadam) आणि दोन परिचारिका अशा एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केलं होतं. आता याच प्रकरणात मध्यरात्री डॉ. नीरज कदम (Dr. Neeraj Kadam) यांना पोलिसांनी अटक केलं आहे. या अटकेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

डॉ. रेखा कदम यांची पोलीस कोठडीत चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी आतापर्यंत दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी १२ जानेवारी रोजी रुग्णालय परिसरातील बायोगॅस चेंबरमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताचे भ्रुण शोधण्यासाठी तपासणी केली. याच दरम्यान पोलिसांना त्याच चेंबरमध्ये १२ कवट्या आणि ५४ हाडं आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी डॉ. रेखा कदम यांना सहकार्य करणाऱ्या दोन परिचारिकांनाही अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!