Share

‘अशा प्रवृत्तीला आमच्या हद्दीत प्रवेश नाही’, गुळूंब ग्रामपंचायतीचे ‘स्टार प्रवाह’ला पत्र

Published On: 

मुंबई: ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेता किरण माने यांना फेसबुकवर राजकीय भूमिका मांडली म्हणून मालिकेतून काढण्यात आले. या प्रकरणाचे चित्रपटसृष्टी तसेच राजकीय क्षेत्रातही पडसाद उमटले. स्टार प्रवाह या वाहिनीवर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. आता स्टार प्रवाहला अजून एक मोठा धक्का बसला आहे. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचं सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील गुळुंब गावात चित्रिकरण सुरु आहे. पण किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आल्याने आता गुळुंब गावाच्या सरपंच स्वाती शिवाजी माने (Sarpanch Swati Shivaji Mane)यांनी गुळुंब ग्रामपंचायतीमध्ये ( Gulumba Gram Panchayat)मालिकेच्या चित्रिकरणास परवानगी नाकारली असल्याचे पत्र ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या टीमला पाठवले आहे.

पात्रत काय म्हटले आहे?

“राजकीय भूमिका मांडणाऱ्या मराठी कलावंताला मालिकेतून काढल्याबद्दल मराठी चित्रपटसृष्टीचा जाहीर निषेध! अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनी आणि मुलगी झाली हो या मालिकेची संपूर्ण टीमने हे विसरु नये की, महाराष्ट्रात अजनूही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर लोकशाही नांदते. अशा मनुवादी विचारसरणीच्या स्टार प्रवाह वाहिनी आणि मुलगी झाली हो मालिकेच्या टीमचे आमच्या गावी होत असलेल्या चित्रीकरणाला ग्रामपंचाय गुळुंब तालुका वाई जिल्हा सातारा मान्यता नाकारत आहे. अशा प्रवृत्तीला इथून पुढे आमच्या हद्दीत प्रवेश नाही”असे पत्र गुळुंब गावाच्या सरपंच स्वाती शिवाजी माने यांनी पाठवले आहे.

दरम्यान किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मालिकेच्या सेटवरुन गेल्यांनतर मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. सोशल मीडियावर मी जे काही व्यक्त झालो तो किरण माने वेगळा आहे. राजकीय भूमिका मांडणे हे माझे व्यक्तीगत विचार आहेत. तो माझा हक्क आहे. मी घरात काय खातो, मी बाहेर काय बोलतो, कपडे काय घालतो, यावर कुणीही बंधन ठेवू नये. ही लोकशाही आहे, हा काही अफगानिस्तान नाही, पाकिस्तान नाही. हा भारत आहे.” असे ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!