पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशपातळीवर निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर भाजपने टीका करायला सुरुवात केली आहे. गोवा, उत्तर प्रदेश आणि मणीपुर या राज्यांमध्ये निवडणुका लढवणार असल्याचे शरद पवारांनी जाहीर केले आहे. या निर्णया नंतर राष्ट्रवादी तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका भाजप नेत्यांकडून होत आहे.
देशातल्या इतर राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपचे विरोधी पक्ष नेते व गोवा राज्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका करत म्हणलं की, राष्ट्रवादी कॉंग्रेस हा गल्लीतला पक्ष आहे, या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी फडणवीस यांना चांगलेच फटकारले आहे. पुण्यात बोलताना अजित पवार म्हणाले, कोणालाही कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत तिथपर्यंत पोहोचलेला असतो. शरद पवारांची उंची काय आहे, त्यांचे देशपातळीवरील काम आणि आदराची भावना या सर्वांचा विचार करून नवीन पिढीने बोलले पाहिजे, तारतम्य बाळगले पाहिजे, अशा स्पष्ट शब्दात पवारांनी फडणवीसांना फटकारले आहे.
महत्वाच्या बातम्या:
विराट कोहलीने कसोटी संघाचेही कर्णधारपद सोडले, सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत म्हणाला…
धोनीनंतर ‘हा’ खतरनाक खेळाडू होणार CSKचा कर्णधार? ३ वेळा जिंकली आहे आयपीएल ट्रॉफी
कंगनाच्या गालापेक्षाही नितळ रस्ते बनवणार,काँग्रेस आमदाराचे गजब वक्तव्य
शरद पवारांच्या भेटीनंतर किरण मानेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

