Share

कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर; प्रस्थापितांना धक्का

Published On: 

कोल्हापूर : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची (Municipal Corporation) प्रारुप प्रभाग रचना, आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या प्रभाग रचनेमुळे कोल्हापूर महानगर पालिकेतील नगरसेवकांची संख्या ११ ने वाढली असून ती आता ८१ वरुन ९२ झाली आहे. महापालिकेसाठी आरक्षण देखील जाहीर झाले असून ७९ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी, अनुसूचित जाती प्रवर्ग १२ जागा तर अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव आहे.

कोल्हापूर महापालिकेने प्रभाग प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर अनेक प्रस्थापित नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे. प्रस्थापित नगरसेवकांचे हक्काचे प्रभाग फुटल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बहूसदस्यीय प्रभागपद्धती असल्यामुळे जुन्या प्रभागाचा विस्तार झाल्याचे देखील समोर आले आहे. प्रशासनाने १४ फेब्रुवारी पर्यंत प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्याचा आवाहन देखील केले आहे.

प्रभाग रचना जाहीर झाल्याने कोल्हापुरातील राजकीय पक्ष काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी, (NCP) शिवसेना, (Shivsena) भाजप, (BJP) ताराराणी आघाडी येत्या काळात निवडणुकीच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याची राज्य सरकारची तयारी नसल्याचे बोलले जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रथम प्रभाग रचना निश्चित करायला सांगितले आहे. त्यामुळे ८ फेब्रुवारी रोजी ओबीसी आरक्षणाचा निकाल सुप्रीम कोर्टात जाहीर झाल्यानंतर या संदर्भातील अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!