औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा दूध संघाची निवडणूक यंदा मोठ्या प्रमाणावर गाजली आहे. त्या पाठीमागे अनेक कारणे आहेत. मात्र सध्या शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये सुरू असलेली तू-तू-मै-मै सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी भाजपचे हरिभाऊ बागडे यांची निवड झाली आहे. मात्र उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) आणि रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे(Sandipan Bhumre) यांच्यातच वाद झाला आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शिवसेना आमदारांचे सर्वत्र मोठे वजन पाहायला मिळते. मात्र राज्याच्या राजकारणात भाजपवर सडकून टीका करणारे शिवसेनेचे मंत्री आता स्थानिक राजकारणात एकमेकांविरोधात भिडलेले पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद झाला आहे. संघाच्या अध्यक्षपदी बागडे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र शनिवारी उपाध्यक्षपदाची निवडणूक होती. यावेळी हरिभाऊ बागडे, संदिपान भुमरे, अंबादास दानवे, आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी दिलीप निरपळ यांना उमेदवारी दिली.
मात्र अब्दुल सत्तार यांचे समर्थक असलेल्या गोपालसिंग राजपूत यांना संधी देण्याची विनंती सत्तार यांनी केली होती. सत्तार यांची ही विनंती धुडकावून लावत निरपळ यांना उमेदवारी देण्यात आली. आणि अखेर त्यांचा विजय झाला. गोकुळ सिंह राजपूत यांना पराभवाचा सामना करावा लागला. आपण दिलेल्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे कळताच सत्तर संतापले अन हरिभाऊ बागडे यांच्यावरही त्यांनी आरोप करण्यास सुरुवात केली. तसेच स्वतःच्या पक्षाचे मंत्री असलेल्या भुमरे यांचे घोटाळे आपण बाहेर काढणार असल्याचे त्यांनी नाव न घेता सांगितले. तसेच पुढील निवडणुकीत पैठण मधून नवा उमेदवार मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

