🕒 1 min read
औरंगाबाद: हा केवळ त्यांच्या आयुष्यातील प्रवासाचा शेवट आहे…लता दीदी त्यांच्या गाण्यांद्वारे करोडो चाहत्यांच्या हृदयात त्या सदैव जिवंत राहतील. स्वरा कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर(Late Mangeshkar) यांच्या पवित्र आत्म्यास ईश्वर शांती देवो आणि आपल्या सर्वांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. अशा शब्दांमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी लता दीदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
गाणकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांनी आज (दि.६) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. आपल्या सुमधुर आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या लता मंगेशकर यांनी अनेक अजरामर गीते गायली आहेत. लता दीदींच्या जाण्याने संपूर्ण भारतावर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यातच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. शनिवारी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली होती.
"मेरी आवाज़ ही, पहचान है
गर याद रहे…"यह केवल उनकी जीवन यात्रा का अंत है…लता दीदी हमेशा अपने गीतों के जरिये करोड़ों प्रशंसकों के दिलों में हमेशा जिंदा रहेंगी।
ईश्वर स्वर कोकिला भारत रत्न लता मंगेशकर जी की पवित्र आत्मा को शांति प्रदान करें और हम सभी को यह दुख सहने की शक्ति दें। pic.twitter.com/sftO9mmmUa— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) February 6, 2022
मात्र रात्री उशिरा पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. अखेर रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. लता दीदींच्या जाण्याने सांगीतिक क्षेत्राचे मोठे नुकसान तर झालेच आहे मात्र संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. गेली अनेक दशके तरुणांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या ओठी लता दीदींची गाणी अजरामर आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्याच्या निधनाने राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
