Share

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार मुंबईत; ट्विटद्वारे वाहिली श्रद्धांजली

Published On: 

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज रविवार दि. ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यानं ८ जानेवारीला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांना कोरोनासोबतच न्युमोनियाची लागण झाली होती. प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत प्रभूकुंज इथे ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येणार असल्याची माहिती आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातील दिग्गज नेत्यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. शोकभावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी माझं दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही-मी माझं दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या. ‘दयाळू आणि काळजी करणाऱ्या लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यामुळे देशात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ती न भरून निघणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या एक दिग्गज म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना लक्षात ठेवतील. त्यांच्या सुरेल आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची क्षमता होती,’ अशा शब्दांत मोदींनी लतादीदींना आदरांजली वाहिली.

केंद्र सरकारने जाहीर केला दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यदर्शनाकरता जशी व्यवस्था शिवाजी पार्कवर करण्यात आली होती. त्याप्रमाणेच शिवाजी पार्कवरच लतादीदींच्या अंत्यदर्शनाकरता व्यवस्था होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!