Share

‘चेहरा काळाआड गेला तरी नजरेआड जात नाही’; पंकजा मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज कायमचाच हरपला आहे. आज (६ फेब्रुवारी) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी (Lata Mangeshkar dies at 92) त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांचे निधन झाले.

लता मंगेशकर यांनी असंख्य गाणे गायली (Lata Mangeshkar Songs) आहेत. विविध भाषांमध्ये त्यांनी गायन केले आहे. तसेच सर्वात जास्त रेकॉर्डिंग करण्याचा विश्वविक्रम देखील त्यांनी केला असून त्यामुळे त्यांचे नाव गिनीज बूकमध्ये देखील नोंदवण्यात आले आहे. लता मंगेशकर यांच्यावर आज सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रत्येक स्वर ऐकणार्‍या, गाणार्‍या, गुणगुणणाऱ्यांनाच नव्हे तर अगदी आसमंतातील स्वरांच्या अणू-रेणूंनाही प्रभावित करणारा तो मंजुळ पवित्र आवाज, सोज्वळ भाव, जरीकाठी साड़ी, अंगभर पदर, लोभस हसरा चेहरा काळाआड गेला तरी नजरेआड जात नाही. “आदरांजली” लता दीदी नेहमी सुरात कोरल्या राहतील, मनात देखील.., अशा शब्दात मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!