Share

‘जाग येवो अंबे, सरकारला जाग येवो’

Published On: 

मुंबई : गेले ६ महिने राज्यासह देशाला कोरोनाने विळखा घातला आहे. याकाळात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी अचानक लॉकडाऊन करण्यात आला आणि सर्व क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. या काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून स्थापन झालेल्या महाविकास आघाडीवर विरोधकांनी टीकांची सरबत्ती सुरु ठेवल्याने राजकारण मात्र तापलेलं पाहायला मिळालं.

आर्थिक चक्र उलटण्यासोबतच देशभरात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि म्हणूनच देशभरात प्रत्येक सण, उत्सव साधेपणाने साजरे करावे यासाठी राज्यातील सरकारांनी नियमावली जाहीर करत विनंती केल्याचे दिसून आले. त्याचे पालन करत सर्वच धर्मियांनी एकोपा जपला. तर कोरोनाचे सावट अजूनही गंभीर असल्याने येणाऱ्या सणांवर देखील त्याचा प्रभाव कायम आहे.

अनेक उत्सव काळात कोट्यवधींची उलाढाल होते. लाखो लोकांच्या उपजीविकेची सोय देखील या उत्सव काळात होत असते. यंदा मात्र मोठ्या व्यापाऱ्यांसह हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. आता नवरात्र उत्सव तोंडावर असून गणेशोत्सव काळात तोटा सहन करावा लागलेल्या मूर्तीकारांची व्यथा भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मांडली आहे.

” नवरात्रीला अवघे काही दिवस बाकी आहेत. राज्य सरकारला विनंती करुनही अद्याप देवीच्या मुर्तीची उंची आणि उत्सवाच्या नियमावली बाबत सरकार काहीच निर्णय घेत नसल्याने राज्यातील हजारो मुर्तीकार चिंतेत आहेत. अशाच विलंबाचा फटका गणेश मुर्तीकारांना बसला होता. जाग येवो अंबे, सरकारला जाग येवो!!” अशा शब्दांत या मूर्तीकारांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी ट्विटद्वारे केला आहे. त्यामुळे सरकार नियमावली वेळेत जाहीर करणार का? याकडे अनेक व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!