Share

पोलीस अचानक ठाकरे सरकार पाडण्याइतके सक्षम कसे झाले ?, भाजप नेत्याचा प्रहार

Published On: 

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकाऱ्यांनीच केला होता, असा धक्कादायक खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केल्याने आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खुद्द गृहमंत्र्यांनी असे विधान केल्याननंतर आता अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचा पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता. चार ते पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला,” असे अनिल देखमुखांनी स्पष्ट केले.

मात्र गृहमंत्र्यांच्या या विधानाचा भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘सुशांत आणि दिशा सालीयन प्रकरणात दोन महिने ज्यांना इंचभर पुढे सरकता आले नाही ते पोलीस अचानक ठाकरे सरकार पाडण्याइतके सक्षम कसे झाले? त्यांनी असे कोणते च्यवनप्राश खाल्ले हे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं तर बरे झाले असते’. असा घणाघात भातखळकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!