Share

माणुसकीला काळिमा फासणारी घटना, येथे चोरले जातात मृतक रुग्णाच्या अंगावरील दागिने

Published On: 

वाशीम :- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून मृतक कोविड महिला रुग्णाच्या अंगावरील दागिने गायब झाले आहेत, अशी तक्रार मृतक महिलेचे कुटुंबिय महेश मदन आरू ( रा. रिठद ता. रिसोड ) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याच तक्रारीची प्रत जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच ठाणेदार वाशीम यांनाही देण्यात आली आहे.

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मृतकाचे कुटुंबिय महेश मदन आरू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की माझी आजी पार्वतीबाई राघोजी आरू (रा. रिठद ता. रिसोड) यांना १५ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सदर रुग्णाच्या अंगावर दोन मंगळसूत्र पोत, कानातील कर्णफुले, नाकातील बाळ्या, नाकातील मोरणी व हातातील चांदीच्या पाटल्या होत्या. आजी पार्वतीबाई आरू हिचे १७ सप्टेंबर रोजी निधन झाल्यानंतर आपल्याला भ्रमणध्वनीद्वारे सकाळी दहा वाजता कळविण्यात आले.

आपण घटनास्थळी आल्यानंतर संबंधित व्यक्तीने मृतकाच्या अंगावरील सर्व दागिने काढून तुम्हाला देण्यात येतील, अशी सूचना दिली. दरम्यान, पुढील कोणतीही सूचना न देताच मयत रुग्णाचा मृतदेह शवागारात हलविण्यात आला. दरम्यान, शवागृहात मृतकाच्या अंगावर कोणत्याही प्रकारचे दागिने दिसून आले नाही. आणि आपल्याला अद्यापही यामधील कोणताही दागीला मिळालेला नाही, त्यामुळे मृतकाच्या अंगावरील दागिने गेले कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तरी वरील प्रकरणाची सखोल चाकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, आणि मृतकाच्या अंगावरील दागिने आपल्याला परत देण्यात यावे, अशी मागणी महेश मदन आरू यांनी निवेदनात केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हा पोलिस अधीक्षक, ठाणेदार वाशीम तसेच ठाणेदार ग्रामीण यांना देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!