मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकाऱ्यांनीच केला होता, असा धक्कादायक खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केल्याने आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खुद्द गृहमंत्र्यांनी असे विधान केल्याननंतर आता अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचा पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता. चार ते पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला,” असे अनिल देखमुखांनी स्पष्ट केले.
गृहमंत्र्यांनीच हे बोलणं अपेक्षित नाही!
दरम्यान या सर्व प्रकरणानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अनिल देशमुखांवर टीका केली. राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलणं अपेक्षित नाही. अशा अधिकाऱ्यांची महाराष्ट्रात हिंमत नाही. त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. ते कोरोनापासून लक्ष विचलित करण्यासाठी मुलाखत देत आहेत, असा घणाघात देखील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
त्या अधिकाऱ्यांची बदली!
“नुकत्याच झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्यातील अधिकाऱ्यांची बदली केली गेली. तर काही अधिकाऱ्यांना आजही त्यांना महत्त्वाची पदं दिली आहेत,” असे गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्पष्ट केले असले तरी आता हे अधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- सुप्रिया सुळे आणि ठाकरे पितापुत्रांच्या अडचणीत वाढ, निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी होणार ?
- ‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांनीच रचला ‘महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कट!’ गृहमंत्र्यांनीच केला धक्कादायक खुलासा
- अभिनेत्रीने अनुराग कश्यपवर केले शोषणाचे आरोप; थेट मोदींना मागितली ‘ही’ मदत
- मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नव्हे तर मराठा समाजातील आंदोलनामुळे – चंद्रकांत पाटील
- श्रीरामपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

