पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी आज सकाळी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. मावळते पोलिस आयुक्त के. वेंकटेशम् यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. राज्य सरकारने अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांच्या आणि अधीक्षक दर्जाच्या २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गेल्या गुरुवारी रात्री उशिरा जाहीर केले. त्यात पुण्याच्या आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांचे नेमणूक करण्यात आली आहे.
लॉकडाऊन काळात वाधवान बंधूंना देण्यात आलेल्या प्रवासाच्या पासमुळे त्यावेळी गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचीवपदाची जबाबदारी पाहणारे गुप्ता चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. आयपीएस अधिकारी गुप्ता यांनी मोठी चूक केली होती, त्यांना शिक्षाही झाली, त्यांचे समर्थन करणार नाही. पण त्यांना काही तरी जबाबदारी द्यायची म्हणून पुण्यात आणले, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
मात्र अमिताभ गुप्ता यांच्या नियुक्तीवरून भाजपनेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. ‘लॉकडाऊनच्या काळात वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरचा पास देण्यासाठी गृहखात्यातील अधिकारी अमिताभ गुप्ता यांना राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने सूचना दिल्या होत्या अशी चर्चा आहे. सूचनांचे आज्ञाधारकपणे पालन केल्यामुळे गुप्तांना पुणे पोलीस आयुक्तपदाचे बक्षीस मिळाले’. असा गंभीर आरोप भातखळकर यांनी केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरचा पास देण्यासाठी गृहखात्यातील अधिकारी अमिताभ गुप्ता यांना राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने सूचना दिल्या होत्या अशी चर्चा आहे. सूचनांचे आज्ञाधारकपणे पालन केल्यामुळे गुप्तांना पुणे पोलीस आयुक्तपदाचे बक्षीस मिळाले. pic.twitter.com/dAX3Gsw8vW
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 20, 2020
महत्वाच्या बातम्या
- छोट्याशा जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांच्या; पत्त्यावर जाणार तब्बल एक लाख पत्र
- पोलीस अचानक ठाकरे सरकार पाडण्याइतके सक्षम कसे झाले ?, भाजप नेत्याचा प्रहार
- गृहमंत्र्यांना हे बोलणं शोभत नाही ; प्रवीण दरेकरांचा घणाघात
- माणुसकीला काळिमा फासणारी घटना, येथे चोरले जातात मृतक रुग्णाच्या अंगावरील दागिने
- कांदा निर्यातबंदीचा निर्णय अन्यायकारक ठरणार, या जिल्ह्यातील आमदाराने केले विधान


