श्रीलंका : गेल्या काही दिवसापासुन श्रीलंका क्रिकेट या ना त्या कारणाने सतत चर्चेत आहे. काही दिवसापुर्वी श्रीलंका संघातील खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड यांचा वाद चव्हाट्यावर आला होता. भारत विरुद्धच्या सामन्यापूर्वी श्रीलंका क्रिकेटमधून पाच खेळाडूंनी भारताविरुद्धच्या मालिकेसाठी असलेल्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यानंतर हे खेळाडू कॅम्प देखील सोडून गेले असल्याचे समजले.
यामध्ये लाहिरु कुमारा, कशून रजिता. विश्वा फर्नांडो, अशेन बंडारा आणि लसिथ एबुलडेनिया या पाच जणांनी करार करण्यास नकार दिला. इतकंच नाही तर, हे सर्व टीमचा कॅम्प देखील सोडून निघून गेले.
यावरच श्रीलंकेचा दिग्गज बॉलर मुरलीधरनने नाराजी व्यक्त करत वरिष्ठ खेळाडूंना फटकारले आहे. माजी कॅप्टन अँजलो मॅथ्यूज, कुसल परेरा सारखे वरिष्ठ खेळाडू टीममधील तरुण खेळाडूंवर दबाव टाकत आहेत, असा दावा त्याने केला आहे. या विषयावर बोलताना मुरलधीरननं सांगितले की, ‘ त्यांना वार्षिक कराराची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. आपण आता दौऱ्यावर आधारित करारपद्धती सुरू करायला हवी.’
‘वार्षिक पगारात कपात केल्यानं वरिष्ठ खेळाडू आता तरुण खेळाडूंवर बोर्डाशी करार न करण्याबाबत दबाव टाकत आहेत. बोर्डानं प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी खेळाडूंनी तो स्वीकारला नाही. आता त्यांना वार्षिक कराराचा फायदा मिळणार नाही. त्यामुले टेस्ट क्रिकेटर्सचं सर्वाधिक नुकसान होणार आहे. त्यांना श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून मासिक वेतन मिळणार नाही. तसेच टीमला एक नोव्हेंबरपूर्वी एकही टेस्ट खेळायची नाही.’ असे मुरलीधरनने स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- काउंटी स्पर्धेत अश्विनचा बळींचा सिक्सर, सरे संघाकडून खेळताना केली कामगीरी
- मोठी बातमी! भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण?
- राज्यात आज 8 हजार 602 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर…
- लोकल सुरु करा अन्यथा जनतेसाठी रेल रोको करु ; दरेकरांचा इशारा
- ‘विष्णूपुरी, दुधना’चे दरवाजे उघडले, ९० हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू


