Share

मोठी बातमी! भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण?

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसापासुन भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर काही काळासाठी सुट्टीवर गेला होता. यानंतर आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ बायोबबलमध्ये प्रवेश करण्यासाठी एकत्र येणार होता, मात्र यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. इंग्लंडमधील सुटी संपल्यानंतर सर्व खेळाडू डरहम येथे एकत्रीत येणार होते. येथे एकत्रीत आल्यानंतर हे खेळाडू बायोबबलमध्ये प्रवेश करणार होते. मात्र डरहमला एकत्रीत येण्यापुर्वी सर्व खेळांडूची कोवीड चाचणी करण्यात आली. या चाचणीत एका भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मात्र कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूचे नाव कळु शकले नाही. यादरम्यान हा खेळाडू भारतीय संघासोबत डरहम येथे जाणार नाही. टीम इंडियाच्या या खेळाडूवर विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्याच्यावर तज्ञ डॉक्टर उपचार घेत आहे. मात्र अद्यापही या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यादरम्यान डरहम येथे भारतीय संघ एकत्रीत आल्यानंतर तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!