मुंबई : भारतीय संघाचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक गेल्या काही आठवड्यापासुन चांगलाच चर्चेत आहे. चर्चेचे कारण आहे दिनेश कार्तिकचे समालोचन. डब्ल्युटीसी आणि इंग्लंड-श्रीलंका तसेच इंग्लंड-पाकिस्तान मालिकात तो समालोचक म्हणून काम करत आहे. समालोचनाने कार्तिकने डब्ल्युटीसी सामन्यापासुन त्याने भारतीय चाहत्यांची मने जिकंली आहे
मात्र आता कार्तिकच्या समालोचनामुळे भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान क्रिकेट संघाचे चाहते देखील खुश झाले आहे. यामागे कारण आहे कार्तिकने इंग्लंड पाकिस्तान सामन्यादरम्यान केलेले समालोचन. इंग्लंड आणि पाकिस्तान संघादरम्यान तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात समालोचनावेळी दिनेश कार्तिकने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचे कौतुक केले. कार्तिकच्या या कौतुकाने पाकिस्तानच्या चाहते खुश झाले आहे.
Right! ????❤️@DineshKarthik ????#BabarAzam pic.twitter.com/aNbn8uPhDO
— The Crypto Gems 1000X (@cryptogem1000xx) July 13, 2021
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम हा सपशेल अपयशी ठरला होता. मात्र तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात त्याने शानदार १५८ धावांची दिडशतकी खेळी केली. यावर बोलताना कार्तिक म्हणाला होता की,’जागतीक किर्तीचा फलंदाज जास्त सामन्यासाठी आउट ऑफ फॉर्म नाही राहु शकत, यामुळेच बाबर आझम जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे.’ असे कार्तिक म्हणाला. भारतीय खेळाडूने केलेल्या या कौतुकामुळे पाकिस्ताच्या चाहत्यांनी त्याला सलाम केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- श्रीलंकेविरुद्ध सामन्यांपूर्वी टीम इंडियाचे जबरदस्त फोटोशूट, बीसीसीआयने शेअर केला व्हिडीओ
- काउंटी स्पर्धेत अश्विनचा बळींचा सिक्सर, सरे संघाकडून खेळताना केली कामगीरी
- मोठी बातमी! भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण?
- राज्यात आज 8 हजार 602 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर…
- लोकल सुरु करा अन्यथा जनतेसाठी रेल रोको करु ; दरेकरांचा इशारा


