🕒 1 min read
मुंबई : इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाचा अखेरचा सामना बुधवारी चेम्सफोर्ड येथे पार पडला. अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतीय महिला संघाला ८ गडी राखुन पराभुत केले. यासह भारताने तीन टी-२० सामन्याची मालिका २-१ अशी गमावली.
अखेरच्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत २० षटकात भारताने ६ गडी गमावत १५३ धावांची मजल मारली. भारताकडून या डावात सलामीवीर स्म्रिती मंधानाने ५१ चेंडुत ८ चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधीक ७० धावांची अर्धशतकी खेळी केली. तर इंग्लंडकडुन या डावात सोफी इक्लेस्टोनने ३५ धावांत सर्वाधीक ३ गडी बाद केले.
SERIES WINNERS!!!!!!! pic.twitter.com/TKGKPKRzMC
— England Cricket (@englandcricket) July 14, 2021
प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने १५४ धावांचे लक्ष्य एकोनीसाव्या षटकात २ गडी गमावत सहज पार केले. इंग्लंडकडुन सलामीवीर डॅनियल व्याटने ५६ चेंडुत १२ चौकार आणि १ षटकारासंह ८९ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी साकारली. या डावात भारताकडुन दीप्ती शर्मा आणि स्नेह राणाने प्रत्येकी १-१ गडी बाद केला. धडाकेबाज अर्धशतकासाठी डॅनियल व्याटला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मालिकेत ९८ धावांसह ३ गडी बाद करणाऱ्या नताली सायव्हरला मालिकाविराच्याा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- कार्तिकच्या ‘त्या’ वक्तव्यावर पाकिस्तानी क्रिकेट रसिक खुश!
- श्रीलंकेविरुद्ध सामन्यांपूर्वी टीम इंडियाचे जबरदस्त फोटोशूट, बीसीसीआयने शेअर केला व्हिडीओ
- श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाला ‘गब्बर’ विक्रम नोंदवण्याची नामी संधी
- हरभजनच्या बाळाचे घरी पदार्पण, व्हिडीओ शेअर करत आई गीताने व्यक्त केला आनंद
- भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव! आणखी एका खेळाडूचा अहवाल सकारात्मक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
