मुंबई : गेल्या काही दिवसापासुन भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर काही काळासाठी भारतीय संघ सुट्टीवर गेला होता. यादरम्यान भारताचा आघाडीचा फिरकीपटु गोलंदाज आर अश्विनने कांउटी स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली आहे.
डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावल्यानंतर भारतीय संघावर सराव सामने न खेळण्याचा आरोप करण्यात आला होता. याच पार्श्वभूमिवर आर आश्विनने सरावासाठी काउंटी स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. काउंटी स्पर्धेत अश्विन सरे या संघाकडून खेळत आहे. समरजेटविरुद्धच्या या सामन्यात खेळताना अश्विनने सामन्यातील दुसऱ्या डावात धडाकेबाज गोलंदाजी करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या सामन्यात आर अश्विनने १५ षटके गोलंदाजी करताना २७ धावा दिल्या आणि ६ गडी बाद केले. अश्विनच्या या भेदकमाऱ्यामुळे समरजेटचा संपुर्ण संघ ६९ धावांवर बाद झाल. याच संघाने याच सामन्यात पहिल्या डावात ४२९ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र अश्विनच्या भेदक माऱ्यामुळे चौथ्या डावात सरेला २५९ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र सरेचा संघाने ४ गडी गमावत १०६ धावांची मजल मारली आणि सामना अनिर्णीत राखला.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण?
- राज्यात आज 8 हजार 602 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर…
- लोकल सुरु करा अन्यथा जनतेसाठी रेल रोको करु ; दरेकरांचा इशारा
- ‘विष्णूपुरी, दुधना’चे दरवाजे उघडले, ९० हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू
- ..अन् आव्हाड म्हणाले, ‘माझी एकुलती एक मुलगी राजकारणापासून कोसो दूर आहे आणि राहील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

