Share

बारा बलुतेदारांना स्वतंत्र पॅकेज देऊन मदत करा; वडेट्टीवारांच मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

मुंबई : कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करताना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

१४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा व दुकानांना यात सूट देण्यात आली असली तरी हातावर पोट असलेल्या नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी असून अनेक घटकांचा यात समावेश नसल्याचे भाजप नेत्यांनी लक्षात आणून देत टीकास्त्र सोडलं आहे.

आता, ज्या घटकांकडे दुर्लक्ष झाले आहे अशा घटकांना देखील मदत देण्यात यावी यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र पॅकेज देण्याची मागणी या पत्राद्वारे केली आहे. शिंपी, नाभिक, परीट, लोहार, कुंभार, चांभार, सुतार यांच्यासह उर्वरित बलुतेदारांना मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी विनंती मंत्री वडेट्टीवार यांनी केली आहे.

मागील वर्षी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे तसेच कोरोनाच्या परिणामांमुळे गेल्या वर्षभरापासून अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. राज्यातील बारा बलुतेदारांच्या हातचा रोजगार हिरावला गेला असून त्यांच्या कुटुंबाचं पालन पोषण करणे देखील कठीण झालं आहे. त्यामुळे शक्य होईल ती सर्व मदत करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!