Share

सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी ठाण मांडला आहे. मतदान अवघ्या काही दिवसांवर आल्याने प्रचारसभांसह राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगरिथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.

आता भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर येथील शिवाजी चौकात प्रचारसभा घेतली. यावेळी अजित पवारांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय?, हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, हे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही’, अशा शब्दांत अजित पवार यांनी फडणवीस यांना आव्हान दिले आहे.

याला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अजितदादांना काय झालय मला माहित नाही पण अलीकडच्या काळात ते जास्तच जोरात आहे.  मोठ्या पवार साहेबांवर माझी पीएचडी अजून बाकी आहे, पण आता अजित पवारांवर मी ‘एम.फील’ करणार आहे. त्यासाठी मी काही प्राध्यपक मंडळींना भेटणार आहे. इतके सगळे प्रकार करून देखील हे छ्तीठोकपणे कसे बोलतात याचा मी अभ्यास करणार आहे. तर सरकार कोणाचेही असो हेच उपमुख्यमंत्री कसे याचा देखील मी अभ्यास करणर आहे. असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. हे सरकार पडणार हे नक्की आहे, आणि ते कधी अन् कसे पडणार हे अजित पवारांना माहित आहे. असा घणाघात चंद्रकांत पाटील यांना एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केला आहे.

दरम्यान, मंगळवेढ्यातील सभेत ‘अरे सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा’, असे विधान करत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले होते. हे महावसुली सरकार आहे. या सरकारचा अन्याय, दूराचार आणि भ्रष्टाचार रोखण्याची व हे सरकार चालवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील नागरिकांना मिळाली आहे, ती दवडू नका, असेही फडणवीस म्हणाले होते. त्याचा अजित पवार यांनी समाचार घेतला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!