Share

‘खंडण्या गोळा करायला जशी यंत्रणा कामाला लावली, तशी आरोग्य यंत्रणा कामाला लावली असती तर…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील सुरु आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्राकडे बोट केलं असून विरोधी नेते मात्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत.

आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘खंडण्या गोळा करायला जशी सरकारी यंत्रणा कामाला लावली… तशीच औषधं..ऑक्सिजन..बेडसाठी कामाला लावली असती तर आज महाराष्ट्राचे असे हाल झाले नसते.’ असा प्रहार शालिनी ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी खंडणी वसुलीचा गंभीर आरोप केल्यानंतर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशी नेमली आहे. यामुळे देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला असून १४ एप्रिल रोजी सीबीआयने त्यांची तब्बल ९ तास कसून चौकशी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!